ताऱ्यांच्या सावलीत वेळ संध्याकाळची होती. मी, राजीव देशपांडे,बालन गोरे आणि भानुदास पेंडकर, मनाने एकमेकांच्या अगदी जवळ असणारे आम्ही तिघे मित्र निवांत फिरत त्या रम्य रस्त्यावरून जात होतो. त्या सायंकाळी शिमल्याचा मन गुंगवून ठेवणाऱ्या मालरोडवर जणू नंदनवन अवतरले होते. आकर्षक रंगाच्या लोकरी कपड्यातली गोजिरी मुले. नटून शॉपिंगला निघालेली जोडपी, अनोळखी सेंटचे सुगंधी झोत...अज्ञात भाषेत किलबिलाट आणि कलकलाट करणाऱ्या विक्रेत्या मुली आणि मुले... आम्ही तिघे कुठल्याश्या विषयावर बोलत एकाच दिशेने लांब चालत जात होतो. घाई कुठलीच नव्हती. हळूहळू भोवतालची वर्दळ कमी होत गेली. आमच्या उजव्या हाताला त्या रुंद रस्त्याला लगटून कडा होता. त्या कड्यापलिकडे दूरपर्यंत देवदाराची जंगले दिसत होती. त्या जंगलावर काळसर तांबूस सावल्या उतरत होत्या. अंधार पडू लागला. भिरभिरत थंडगार वारा वाहू लागला. त्या वाऱ्यासोबत एक किंचित उग्र पण हवासा अज्ञात सुगंध. मला असे सारखे वाटत होते, की हा सुगंध त्या देवदारच्या जंगलदऱ्यातला आहे. हळूहळू आकाशात चांदण्य...
Posts
Showing posts from August, 2017
स्पर्श
- Get link
- X
- Other Apps
स्पर्श ´थोडं थांबा ना ! दूध घेवून जा ! आत्ता देते.” आई बाबुगुरूंना म्हणाली. बाबा अजून देवघरातच होते. “ बरं. थांबतो. !” बाबुगुरू एवढंच म्हणाले आणि बैठकीतल्या खुर्चीवर बसले. तसेही अघळ पघळ गप्पा मारताना मी त्यांना कधी पाहिलेच नव्हते. साधे, फारतर रंगीत काठाचे धोतर आणि नेहरू शर्ट हा साधा पोशाख, आणि स्वतःबद्दल कमीतकमी बोलणे. हे पाणी उथळ नव्हते, तर वरून ज्याची कल्पना येणार नाही असा हा एक खोल समुद्र होता. बाबुगुरू आपस्तंब हे खरेखुरे विद्वान, ज्ञानी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होते. पण आपली विद्वत्ता आणि व्यासंग याचा त्यांना मुळीच गर्व नव्हता. उलट त्यांच्या साध्या राहणीमुळे त्यांच्या तपःपूत व्यक्तिमत्वाला एक लोभस परिमाण मिळाले होते. माझ्या बाबांना त्यांच्याबद्दल फार आदर होता. कडक शिस्त, वक्तशीरपणा आणि निःस्पृहता या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्याबद्दल एक प्रकारचा दरारा आणि त्याचवेळी एक कुतूहलयुक्त जिव्हाळा मला वाटे. त्यामुळे पूजा सांगण्यासाठी ते घरी आले की मी त्यांच्या नकळत त्यांचे निरीक्षण करत राही. आत्ताही ते नेहमीसारखेच शांतपणे बसले होते. त्या...